Pune : तरूणांनी राजकारणात यायला घाबरू नये – शिवराजसिंह चौहान

एमपीसी न्यूज – स्वतंत्रपणे काम करायला (Pune) मर्यादा आहेत. राजकारणात आल्याने मोठ्या स्तरावर काम करणे शक्य झाले. आजच्या काळात राजकारणात यायला तरुणांनी घाबरू नये. राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का, युवकांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात येण्याचे आवाहन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठात आयोजित भारतीय छात्र संसद समारोप कार्यक्रमात चौहान बोलत होते. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यावेळी उपस्थित होते.

Pimpri : मोबाईल आणि टीव्हीच्या दुनियेतून बाहेर पडून मुलांनी मैदानी खेळामध्ये उतरावे – अमित गोरखे

माझ्या मतदारसंघातून आतापर्यंत मी अकरा वेळा निवडून आलोय. मी माझ्या मतदारसंघात प्रचार करत नाही. राजकारणातील पैशाचा प्रभाव संपवण्यासाठी राजकारणात या. स्वतःला ओळखा. तुम्ही तुम्हाला हवे ते मिळवू शकता. स्वतंत्रपणे काम करायला मर्यादा आहेत. राजकारणात आल्याने मोठ्या स्तरावर काम करणे शक्य झाले. राजकारणात यायला घाबरू नका. राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का? असा सवालही चौहान यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.