BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पोलिसांचे कोबींग ऑपरेशन; 62 गुन्हेगारांची धरपकड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्तालयाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणत कारवाईला सुरुवात केली असून पिंपरी परिसरात शुक्रवारी (दि.15) पहाटे दोन ते सहा या वेळेत कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले.

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी फुलेनगर, रामनगर, शंकरनगर, मोहननगर याभागातून 62 जणांना ताब्यात घेतले. यामध्ये दरोडा, चोरी, मारामारी असे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची कसून चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले. या कारवाई मध्ये 9 पोलीस निरीक्षक, 21 पोलीस उपनिरीक्षक, 18 सहायक पोलीस निरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात इतर ठिकाणी देखील अशीच कारवाई करण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A4

.