Shirur : शिरुरमध्ये आजी-माजी शिवसैनिकांमध्ये रंगणार सामना !

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदार संघात आजी-माजी शिवसैनिकांमध्ये सामना रंगणार आहे. शिवसेना-भाजप युतीचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. कोल्हे यापूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे आजी-माजी शिवसैनिकांमध्ये सामना रंगणार आहे. कोल्हे मूळचे जुन्नर तालुक्यातील आहेत. छत्रपती संभाजी मालिकेच्या माध्यमातून कोल्हे घराघरात पोहचले आहेत. त्यामुळे कोल्हे यांच्या रुपाने आढळराव यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण झाले असून कोल्हे जोरदार टक्कर देतील, असे राजकीय जाणकार बोलत आहेत.

पूर्वीच्या खेड आणि 2009 मध्ये पुनर्रचना झालेल्या शिरुर लोकसभा मतदार संघातून दोन वेळा असे सलग तीनवेळा निवडून येण्याचा विक्रम शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे. त्यांनी तीनही वेळेस राष्ट्रवादीच्या उमेदरावाराचा पराभव केला. आढळराव यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादीचे आमदार घाबरत असल्याची सातत्याने चर्चा होती.

राष्ट्रवादीकडून 2009 च्या लोकसभा निवडणूक विलास लांडे यांनी तर 2014 मध्ये देवदत्त निकम यांनी लढविली होती. त्यांचा आढळराव यांनी पराभव केला होता. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपासून शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तगडा उमेदवार मिळत नव्हत्या. त्यामुळे खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरुमधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती.

शिरुर मतदार संघातील जुन्नरचे रहिवाशी असलेले शिवसेनेचे उपनेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे या मोह-यालाच गळाला लावले. पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. दुरचित्रवाहिनीवरील छत्रपती संभाजी मालिकेच्या माध्यमातून कोल्हे घराघरात पोहचले आहेत. कोल्हे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच आढळराव यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत. आढळराव आणि कोल्हे यांच्यात लढत होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदार

बाबुराव पाचर्णे, शिरूर (भाजप)
सुरेश गोरे, खेड-आळंदी (शिवसेना)
महेश लांडगे, भोसरी (भाजप सहयोगी)
दिलीप वळसे-पाटील, आंबेगाव (राष्ट्रवादी काँग्रेस)
शरद सोनवणे, जुन्नर (मनसे-शिवसेनेत प्रवेश)
योगेश टिळेकर, हडपसर (भाजप)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like