BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बनावट तिकीट दाखवून विमानतळावर प्रवेश करणाऱ्या कारचालकाला अटक

एमपीसी न्यूज- बनावट विमान तिकीट दाखवून पुणे विमातळावर बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या कार चालकाला तेथील सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

सुधीर बाळकृष्ण शिंदे (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. मनोज राममूर्ती (वय 43) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला सोडण्यासाठी विमानतळावर आला होता. कारमधून उतरल्यानंतर संबंधित प्रवाशी भाडे न देता उतरल्यानंतर सरळ विमानतळाच्या आत गेला.

त्यामुळे कारचालक असलेल्या शिंदे याने गाडीमालक सुमित मालुसरे याच्याकडून इंडिगो एअरलाइन्सचे बनावट तिकीट व्हाट्सएपद्वारे मागविले. त्यानंतर त्याने हे तिकीट प्रवेशद्वारवर दाखवून विमानतळाच्या आत प्रवेश केला. त्याच्या हालचालीवरुन सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्या तिकीटाची पाहणी केल्यानंतर ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शिंदे यास विमानतळ पोलिसांकडे देण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like