Pune Crime News: चहाची टपरी चालविणाऱ्याकडे 500 रुपयांच्या खंडणीची मागणी, तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – चहाची टपरी चालविणाऱ्या एका व्यक्तीकडे 500 रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून विमानतळ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. 

करण हातागळे (वय 25, रा. यमुनानगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  तक्रारदार यांची विमानतळ परिसरात चहाची टपरी आहे. आरोपी करण हा मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास टपरीवर आला. तसेच, त्याने दमबाची करत टपरी चालवायची असेल तर दररोज 500 रुपयांची खंडणी मागितली.

पैसे न दिल्यास टपरी चालवून देणार नाही, असे म्हणत कामगारास शिवीगाळ केली. तर, त्याला हाताने मारहाणकरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारदारांनी पोलीसांकडे तक्रार करताच पोलीसांनी करण याला अटक केली.

उपनिरीक्षक ए. आर. गांधले अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.