Pimpri : इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने ‘सॅनिटायझर टनेल’ची निर्मिती

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी टनेल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण गरजेचे आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने सॅनिटायझर टनेलची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोरोनाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अभिनव उपकरणांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे, पण ऍलर्जी असणाऱ्या लोकांनी यामध्ये प्रवेश करणे योग्य राहणार नाही.

संशोधनाधारित अभिनव उपकरणाचे डिझाईन बनविल्याबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्रा. राजेंद्र सोनकवडे, प्रा. सचिन मठपती व विद्यार्थी विक्रम कोरपाले यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.