Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 22 रुग्णांची नोंद, 66 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. शहराच्या विविध भागातील 22 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 66 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एक रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 623 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 58 हजार 824 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 274 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 246 रुग्ण गृहविलगीकरणात असून 28 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 10 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 741 आहेत. आज दिवसभरात 4 हजार 668 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 34 लाख 35 हजार 46 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.