Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 298 रुग्णांची भर; 58 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 11) 298 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 3 हजार 198 एवढी झाली आहे. तर आजवर 98 हजार 257 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण चाकण (पुरुष, 70 वर्ष) येथील आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 830 तर शहराच्या बाहेरील 772 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 952 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 2 हजार 159 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 121 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 303 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात आज 351 जणांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली असून आजवर लस घेतलेल्यांचा शहरातील आकडा 18 हजार 159 एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.