Pimpri Corona Update : शहरात आज 313 नवीन रुग्ण, 468 जणांना डिस्चार्ज, 10 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 289 आणि पालिका हद्दीबाहेरील 24 अशा 313 नवीन कोरोना रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 84 हजार 564 झाली. तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 468 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 8 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 2 अशा 10 रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यात भोसरी, देहूरोड, पिंपळेगुरव, दिघी, चिखली, चिंचवड, निगडी, सांगवी, तळेगांव, राजगुरुनगर येथील रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 84 हजार 564 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 79 हजार 746 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1455 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 580 अशा 2035 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2376 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.