Pimpri Corona Update : नवीन रुग्णसंख्येत मोठी घट! आज 252 नवीन रुग्ण, 609 जणांना डिस्चार्ज, 16 मृत्यू

एमपीसी न्यूज – मागील पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येला ब्रेक लागला आहे. नवीन रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. शहराच्या विविध भागातील 246 आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 252 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 84 हजार 31 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 609 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 9 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 16 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात भोसरी, मोशी, चिंचवड, पिंपळेगुरव, अजमेरा, घरकूल, तळेगांवदाभाडे, पिंपळगाव, शिरूर, चाकण, बदलापूर, देहूगाव, खेड येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 84 हजार 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 78 हजार 58 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1441 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 566 अशा 2007 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2554 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.