Pimpri Corona Update : रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज 19 नवीन रुग्णांची नोंद, 26 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 19 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 69 हजार 863 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 478 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 464 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Pune News : ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई

तर, 14 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 70 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 44 हजार 692 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.