Dhankawadi Regional Offices : लाच मागितल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे विभागीय निरीक्षक अटकेत

एमपीसी न्यूज : इमारतीचा (Dhankawadi Regional Offices) मिळकत कर नावावर करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या विभागीय निरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बबन काळे (वय 45) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. पुणे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कर विभागात तो कार्यरत होता. त्याला अटक करण्यात आली आहे.

Pimpri Corona Update : रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज 19 नवीन रुग्णांची नोंद, 26 जणांना डिस्चार्ज

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एका 31 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या इमारतीचा मिळकत कर त्यांच्या नावावर करून देण्याकरिता आणि जुना मिळकत कर न लावण्यासाठी काळे यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदार व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर 14 जुलै आणि 28 जुलै रोजी त्याची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर यामध्ये दोषी आढळल्यानंतर संजय काळे यांच्यावर आज भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Dhankawadi Regional Offices) करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.