Rupali thombare: पुन्हा पानटपरीवर चुना लावायला बसावं लागेल; रूपाली ठोंबरे यांचा निशाणा कोणावर? 

एमपीसी न्यूज: शिंदे गडाचे नेते गुलाबराव पाटील यांचा पान टपरी ते मंत्री असा प्रवास आहे. मात्र त्यांच्या बोटीचा विकास झालेला दिसत नाही असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला उपाध्यक्षा रूपाली पाटील ठोंबरे यांनी लगावला आहे.(Rupali thombare) गुलाबराव पाटील यांनी जळगावतील एका कार्यक्रमात महिलांविषयी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना ठोंबरे यांनी गुलाबराव पाटील यांना जोरदार टोला लावला.

जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी स्त्री रोग तज्ञ कधीच महिलांचे हात पाय पाहत नाहीत असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातो. रूपाली पाटील यांनी देखील खास आपल्या शैलीत गुलाबराव पाटील यांना टोला लगावला.(Ruplai thombare) कुठल्या कार्यक्रमात काय बोलावे याचे भान नेत्यांना नाही. अक्षरशः लाज वाटते. मुळात गुलाबराव पाटील हे पानाला चुना लावणारे आहेत. कुठलाही व्यवसाय वाईट नसतो मात्र पान टपरी ते मंत्री असा प्रवास केलेल्या गुलाबराव पाटील यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही.

Pimpri Corona Update : रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज 19 नवीन रुग्णांची नोंद, 26 जणांना डिस्चार्ज

खरंतर कोणत्याही कार्यक्रमात बोलत असताना मंत्र्यांनी भान ठेवले पाहिजे.(Rupali thmobare) मात्र गद्दारांना कोणतेही धोरण नाही स्त्रीरोग तज्ञ हातपाय नको बघू दे पण येणाऱ्या काळात तुम्हाला परत मंत्री पासून ते पान टपरीवर सुद्धा लावायला बसावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.