Pimpri corona Update : शहरात आज 128 नवीन रुग्णांची नोंद, 84 जणांना डिस्चार्ज; 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 123 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 128 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची कोरोना रुग्णसंख्या 96 हजार 851 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा चार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात बालाजीनगर येथील 58 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 65 वर्षीय पुरुष, खेड येथील 57 वर्षीय पुरुष आणि जुन्नर मधील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 96 हजार 851 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 93 हजार 559 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1759 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 7333 अशा 2492 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 647 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 866 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

इंग्लंडहून हवाई प्रवासाद्वारे शहरात आलेल्या 181 जणांचे अहवाल निगेटीव्ह !

इंग्लंडहून विमानाने मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 14 प्रवाशी भारतात परतलेले नाहीत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहे. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.

उर्वरीत 188 प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी 181 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, 7 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत. एकाचाही अहवाल प्रलंबित नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.