Pimpri : नगरसेवक बाबू नायर यांना पितृशोक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस आणि नगरसेवक बाबू नायर यांचे वडील एम. शंकरनारायणन नायर यांचे आज (बुधवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 97 वर्षे होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांची अंत्ययात्रा उद्या (गुरुवारी) सकाळी नऊ वाजता पिंपरी, मोरवाडीतील म्हाडा येथून निघणार आहे. चिंचवड, लिंकरोड येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात मुलगा नगरसेवक बाबू नायर, मोहन नायर, प्रसन्ना पिल्लई, प्रेमा पिल्लई, चंद्रशेखर, रामचंद्रन, सुशीला, रेजनी, नातू डॉ.महेश, प्रशांत, प्रिती, डॉ. दिशा, अक्षय, सोम्य्या, अभिषेक, अथिरा, अनिका असा मोठा परिवार आहे.

एम.एस. नायर यांनी खडकीतील ऍम्युनेशन फॅक्टरीमध्ये 40 वर्ष नोकरी केली. निवृत्त झाल्यानंतर केरळमधील नागरिकांसाठी त्यांनी कार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.