Pune : खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – चहा पिण्यासाठी थांबलेल्या इसमाचा खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची घटना काल मंगळवारी (दि. 25) मुंढवा येथील तुलसी हॉल चौक येथे पहाटे सव्वापाच च्या दरम्यान घडली आहे.

परशुराम उर्फ सोन्या नारायण पिल्ले वय 25 राहणार सर्वोदय कॉलनी मंडवा आणि मनोज नागनाथ गायकवाड 24 राहणार सर्वोदय कॉलनी मुंढवा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी प्रशांत पाटील ( वय 33, रा. तळवडे निगडी, प्राधिकरण पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत पाटील हे मुंढवा येथील तुलसी हॉल चौकात पहाटे चहा पिण्यासाठी थांबले होते. यादरम्यान आरोपी परशुराम आणि मनोज हे दोघे दुचाकीवर प्रशांत यांच्याजवळ आले आणि त्यांनी प्रशांत यांच्या खिशातील 15 हजाराचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.याप्रकरणी मोबाईल चोरून नेणाऱ्या परशुराम आणि मनोज या दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.