Pune : पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर विसर्जन मिरवणूक दरम्यान मोबाईल चोरीला गेल्याच्या 1 हजार पेक्षा जास्त तक्रारी  

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या  ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या ऑनलाइन (Pune)  पोर्टलवर विसर्जन मिरवणूक दरम्यान चोरीला गेलेल्या फोनच्या 1 हजारहून जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत गर्दीचा फायदा घेत अनेक नागरिकांचे दागिने, मोबाईल चोरीला जातात .

यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार देण्यासाठी  ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

Pune : अद्यापही पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरुच

या पोर्टलवर एक हजारहून जास्त तक्रारी पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या ऑनलाइन पोर्टलवर करण्यात आल्या आहेत. विश्रामबाग, खडक, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल चोरीला गेल्याच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या.

नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून 50 मोबाइल संच जप्त करण्यात आले.मध्यरात्री लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाइल संच (Pune) चोरट्यांनी चोरले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.