Chinchwad : मूर्तीदान उपक्रमात 11 हजारपेक्षा अधिक मूर्त्यांचे संकलन

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र (Chinchwad ) राज्य पिंपरी चिंचवड शहर, पिंपरी चिंचवड महापालिका, डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात राबविण्यात आलेल्या गणपती दान उपक्रमाला नागरिकांनी मागील वर्षीपेक्षा अधिक प्रतिसाद दिला. यावर्षी गणेशोत्सवात 11 हजार 536 गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. ते 28.5 टन निर्माल्य जमा झाले.

गणेशोत्सव विसर्जनाच्या दहाव्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत चिंचवडगाव येथील घाटावर भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 7 पासून रात्री 12 वाजेपर्यंत 7 हजार 25 मूर्तींचे दान मिळाले. तर सुमारे 16 टन निर्माल्यदान मिळाले. मागील वर्षी दहा दिवसात 7 हजार 499 मुर्त्यांचे संकलन आणि 13 टन निर्माल्य संकलन करण्यात आले. मागील वर्षीपेक्षा यावर्षी 4 हजार 37 मूर्ती आणि 15 टन निर्माल्य अधिक संकलित झाले आहे.

सुमारे 50 स्वयंसेवकांनी चापेकर चौक ते चिंचवड घाट दरम्यान विशेष पोलीस अधिकारी म्हणून पोलिसांना मदत केली. शब्बीर मुजावर यांचा नेतृत्वात स्वयंसेवकांनी काम केले.

ब प्रभाग अधिकारी अमित पंडित आणि संस्कार प्रतिष्ठानचे (Chinchwad ) अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दहा दिवस राबविण्यात आला. संस्थेच्या सदस्यांनी शिफ्ट प्रमाणे अविरत स्वयंसेवा केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भरत शिंदे, मनोहर कड, शब्बीर मुजावर, प्रभाकर मेरुकर, सुशिलकुमार गायकवाड, आनंद पाथरे, नसिम शेख, प्रिया पुजारी, सुनंदा निक्रड, नम्रता बांदल, संजित पद्मन, यश ढवळे, विश्वास राऊत, अरुण कळंबे, अभिजित पाटील, रमेश भिसे, महेंद्र जगताप, स्वप्निल पुजा पुराणिक सुतार, जितेंद्र जाधव,

Pune : अद्यापही पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरुच

सतीश उघडे, विकास हाटे, आनंद पुजारी, सोमनाथ पतंगे, सुधाकर खुडे, अर्पिता आजगावकर, मिनाक्षी मेरुकर, भानुप्रिया पाटील, विकास पाटील, शैलजा पेरकर, वैश्नवी पुजारी, अनन्या पुजारी, नंदकिशोर खंडागळे, सायली सुर्वे, पल्लवी नायक, बाजिराव पतंगे, उमेश गुर्जर, विनोद काळे, हितेश पवार, सुनिता गायकवाड, स्मिता पद्मन, मनिषा आगम, विजय आगम, कविता वाल्हे, मनिषा आगम, विजय आगम, स्वाती म्हेत्रे, श्वेता मोरे, रोहित मोरे, स्वामी पाटील, ओम पाथरे, पालिकेचे चेतन देसले, सचिन घनवट, प्रतिक जगताप, रमेश कापुरे, शैलेश पोळ यांनी परिश्रम घेतले.

प्रतिभा काॕलेज चिंचवडचे राष्ट्रीय सेवा योजने विद्यार्थी आणि मोरया प्रतिष्ठान (Chinchwad ) चिंचवडचे विद्यार्थी यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. निर्माल्यदान घेण्यासाठी संस्कार संस्कृती सद्भावना महिला बचत चिंचवडेनगर यांनी मदत केली.

यावर्षी मिळालेले मूर्तिदान आणि निर्माल्य दान
दिवसमूर्ती संख्या. निर्माल्य (टन मध्ये)
दिड दिवस 7183.5
पाचवा16026
सातवा18526
नववा 3393
दहावा702516

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.