Pimpri Crime News : कासारवाडी येथे घरफोडी; दागिने व रोख रक्कम लंपास

एमपीसी न्यूज – गावी गेले असताना चोरट्यांनी बंद घरात घरफोडी करत घरातील दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना मंगळावारी (दि.24) कासारवाडी (Pimpri Crime News ) येथे घडली आहे.

मारोती चिमाजी लांघी (वय 61 रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : रिक्षाची सीट भरण्यावरून रिक्षा चालकांमध्ये मारामारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबीयासह बाहेरगावी गेले होते, यावेळी  चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील 17 हजार 800 रुपयांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.