Khed : रिक्षाची सीट भरण्यावरून रिक्षा चालकांमध्ये मारामारी

एमपीसी न्यूज – रिक्षाची सीट भरण्यासाठी ग्राहकांवरून दोन रिक्षा चालकांमध्ये मारामारी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) माणेकरवाडी, खेड (Khed) येथे घडला आहे.

सागर दत्तात्रय गाढवे (वय 27, रा.भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फास्क अन्सार पठाण, सोन्या उर्फ बागड राजेंद्र मोरे, ऋषिकेश प्रकाश वटांबे (सर्व रा. चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pravin Nikam : पुण्यातील शेतकरी पुत्राचा लंडनमध्ये सन्मान; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींना ऑटो रिक्षाची सीट भरण्यावरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून (Khed) सोन्याने फरशीचा तुकडा मारत जखमी केले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.