Pravin Nikam : पुण्यातील शेतकरी पुत्राचा लंडनमध्ये सन्मान; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त (Pravin Nikam) प्रभावीपणे काम करणाऱ्या 75 प्रतिभावान युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलूम्नी युनियन माध्यमातून करण्यात येत आहे. या 75 युवकांमध्ये पुण्याच्या प्रवीण निकमची निवड झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लंडन येथे हा गौरव सोहळा पार पडला.

शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विदेशात असणाऱ्या उच्चशिक्षणाच्या संधीबाबत मार्गदर्शन, 53 देशांची समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम या सर्वांची दखल ब्रिटिश कौन्सिल व नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अलूम्नी युनियन यांनी घेतली.

भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, ब्रिटिश कौन्सिल शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यापीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न या परीक्षकांनी भारतातील ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या 75 युवकांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे.

ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 75 वर्षात ब्रिटनमध्ये शिकलेल्या भारतातील 75 माजी विद्यार्थी ज्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. सदर अवार्डमध्ये (Pravin Nikam) अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा समावेश आहे.

Pune News : श्री साई सेवा संस्था च्या गतीमंद मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

मूळ साताऱ्यातील आसू पवारवाडीतील असणारे प्रवीण यांचे वडील नोकरीसाठी शेती सोडून पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत कामगार तर आई गृहिणी. आर्थिक संकटांना न घाबरता, दिवाळीतील उटणे, फिनेल विकून, जोडधंदे करून आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवलं. पिंपरी-चिंचवडच्या कामगार वसाहतीत जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने नामांकित चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली.

परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण करून सहजासहजी मिळणारी मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता भारतात पूर्णवेळ ग्रामीण आणि वंचित बहुजन समाजातील तरुणाईला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी त्याने समता केंद्राची स्थापना केली. समता केंद्र ही नुसती शिक्षणावर काम करणारी संस्था नाही तर नेतृत्व, कौशल्य निर्माण करणार एक केंद्र बनत आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये अर्ज करता येत नाहीत.

आर्थिक अडचणी किंवा प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्तीची माहीत नसते. हीच असमानता ज्ञानाने दूर करून प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये बहुजन तृतीयपंथी व दुर्बल तरुणाईला प्रतिनिधित्व कसं मिळेल यासाठी समता सेंटर काम करत आहे. कौशल्य विकास कार्यक्रमही राबवत आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील विषमता संपवून भारत आणि जागतिक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे आणि भारतातील शिक्षकांचा क्षमता विकास या दोन पातळीवर रचनात्मक काम तो करीत आहे.

यावर्षी प्रवीणच्या मार्गदर्शनातून (Pravin Nikam) अहमदनगरमधील डॉ. ह्रषीकेश आंधळकर, चंद्रपूरचे दीपक चटप, पुण्याचे वैभव वाळुंज लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण तर सोलापूरचे किरण माने नेदरलँडमध्ये पदव्युत्तर शिक्षण संपूर्ण शिष्यवृत्तीवर करत आहे. इतकेच नव्हे तर या आधी शेकडो शिक्षकांना त्याने प्रशिक्षण दिले आहे.

याआधी नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रवीणने युवकांचे समाजाभिमुख संघटन उभे केले. यासाठी त्याला भारत सरकारचा प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे. 2016 मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ झांबियाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रकुल निवडणूक निरीक्षक म्हणूनही त्याने काम केले, हे विशेष. संयुक्त राष्ट्राचे उपमहासचिव अमिना मोहंमद आणि नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये प्रवीणच्या कार्याचे कौतुक केले आहे. गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या प्रवीणचा लंडनमध्ये होणारा गौरव ही बाब महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरते.

“आजवर आपल्या वस्त्या आणि तांड्यावर चालवलेले डीस्कोर्स संशोधन आणि साहित्यातून जागतिक अकादमिक पटलावर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न अम्ही समता सेंटर च्या माध्यमातून करत आहोत. या उपक्रमाला संस्थेची जोड देत वर्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. हा पुरस्कार मी वंचित समुदायांना अर्पण करतो. शिक्षक, युवक आणि स्वयंसेवी संस्था या समाजात बदल घडवणाऱ्या सिस्टम लीडर्स बरोबर काम करत राहणं आणि एक पूर्णवेळ संशोधन केंद्र ऊभे रहावा म्हणून केलेला पर्यंत म्हणजे समता सेंटर.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.