Pune News : श्री साई सेवा संस्था च्या गतीमंद मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

एमपीसी न्यूज – श्री साई सेवा संस्था मधील गतीमंद मुलांनी ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा ( Pune News ) केला. शाळेतील 35 मुलांना ब्लॅंकेट, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. झेंडे, फुगे, चॉकलेट यामुळे शाळेचे वातावरण आनंदमय झाले होते, अशी माहिती “हेल्पिंग हॅण्ड कोथरूड ” आणि “शिवतीर्थ_प्रतिष्ठानचे” गिरीश गुरनानी ,अमोल गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली.

या उपक्रमाचे 20 वे वर्ष होते. यावेळी राहुल खंदारे,प्रीतम पायगुडे,शेखर तांबे,दिनेश राठी,प्रथमेश नाईक,कमलेश फाले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी साई सेवा संस्था ट्रस्ट ला दहा हजार रुपयाची आर्थिक मदत देखील करण्यात आली तसेच जेवणाची सोय देखील हेल्पिंग हॅण्ड कोथरूड आणि शिवतीर्थ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली अशी माहिती गिरीश गुरनानी यांनी दिली.

समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. झेंडा, फुगे, खाऊ मिळाल्यानंतर साई सेवा संस्था येथील  मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान ( Pune News ) देणारा होता, असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.