Chikhali Crime News : महापालिका कर्मचारी असून घराचा कर थकला आहे म्हणत केली वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज – मी महापालिकेत काम करतो. तुमच्या घराचा कर थकला आहे,(Chikhali Crime News ) असे सांगून पादचारी वृद्धाची सोन्याची अंगठी आणि मोबाईल घेऊन अनोळखी व्यक्ती पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता पवारवस्ती, चिखली येथे घडली.

अविनाश मनोहर पवार (वय 75, रा. निगडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime News : खंडणी मागत क्लिनिकमध्ये तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पवारवस्ती चिखली येथून पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला. दुचाकीवरील व्यक्तीने तो महापालिकेत काम करतो. पवार यांच्या घराचा कर थकला आहे. तो भरला नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल, अशी बतावणी करून पवार यांना कर भरण्यास सांगितले. त्यापोटी आरोपीने पवार यांच्याकडून विश्वासाने 25 हजारांची सोन्याची वेढणी आणि 500 रुपयांचा मोबाईल फोन घेतला आणि आरोपी फसवणूक करून पळून गेला. चिखली पोलीस तपास (Chikhali Crime News ) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.