Pimpri : शहरात भक्तीमय वातावरणात दत्त जयंती साजरी

एमपीसी न्यूज- दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष, भजन, कीर्तन अशा उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणात पिंपरी-चिंचवड शहरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण निगडी, भोसरी,पिंपळे गुरव येथील विविध दत्त मंदिरावर विद्युत रोषणाई, केळीचे खांब, फुलांच्या माळा लावण्यात आला होत्या. भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी भक्तांनी मंदिरे फुलून गेली होती. मंदिरात गुरुचरित्र पारायण, नामस्मरण तसेच रुद्राअभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाले महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

भोसरी औद्योगिक क्षेत्रातील डायनोमर्क कंट्रोलस्,कंपनीच्या वतीने दरवर्षी दत्तजयंती उत्साहात साजरी केली जाते. दत्तमंदिराला रंग देऊन आकर्षक विद्यूत रोषणाई केली. दत्ताची विधीवत पूजा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत व संचालिका आमिता राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी उत्पादन बंद ठेवून कंपनीतील सर्व मशीनरीची व परिसराची स्वच्छता करण्यात आली. असे मनुष्यबळ विभाग प्रमुख सूर्यकांत मुळे यांनी सांगितले. दत्तजयंतीच्या दिवशी सर्व कामगारांना व त्याच्या कुटुंबीयांना स्नेहभोजन देऊन दत्तजयंती साजरी केल्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण होते. प्रत्येक कामगार आपल्या कुटुंबाला मशीनची व उत्पादनाची माहिती देत होते.

यामुळे आम्हाला कंपनी म्हणजे एक कुटुंब आसल्याची भावना निर्माण झाल्याचे गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी सांगितले. दिवसभर भक्तीगीतांनी कंपनी परिसर भक्तीमय झाल्याचे अक्षरा राऊत यांनी सांगितले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत, संचालिका आमिता राऊत, सूर्यकांत मुळे, अण्णा जोगदंड, विभागप्रमुख हर्षल शेळके, प्रविण बाराथे, अक्षरा राऊत,दिलीप ईधाते, मोहनकृष्णन, प्रिया देशमुख, रवी भेंनकी, स्वप्नील देशपांडे, एल्लापा पौगुडवाले, जयंत राऊत, डाँमनिक स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.