Pimpri : कर्णबधिर तरुणीवर बलात्कार; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कर्णबधिर असलेल्या तरुणीवर मागील पाच महिन्यांपासून वारंवार बलात्कार करणा-या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मावळ तालुक्यातील लोहगड येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या 55 वर्षीय आईने याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार 26 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 21 वर्षीय तरुणी कर्णबधीर आहे. आरोपी हा पीडितेच्या मामाचा मुलगा आहे. आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन ऑक्टोबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत वेळोवेळी बलात्कार केला. आरोपी हा नातेवाईक असल्याने पीडितेच्या घरच्यांना संशय आला नाही. पीडित तरुणी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.