Pimpri : चिट्ठी लिहून तरुणीने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – इमारतीवरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती आली आहे. आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटले आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास खराळवाडी येथे घडली.

वर्षा शंकर जगताप (वय 19, रा. एच ए कॉलनी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खराळवाडी मधील खराळआई उद्यानाजवळ वैष्णवी पार्क ए जे चेंबर्स ही तीन मजली इमारत आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या डक्टमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने आसपासच्या नागरिकांनी डक्टकडे धाव घेतली असता तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याचे दिसले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

वर्षा हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून ती घरीच असते. बुधवारी संध्याकाळी अचानक ती घराबाहेर पडली. तिने खराळवाडी येथील खराळआई उद्यानाजवळच्या वैष्णवी पार्क या सोसायटीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. पोलिसांना तिच्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट मिळून आली आहे. ‘मी आत्महत्या करीत आहे, मला शोधू नका’ असे त्या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.