Chinchwad : कंपनीच्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये चोरी करणा-या कामगारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये चोरी केल्याप्रकरणी तेथील सफाई कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी दीडच्या सुमारास पूर्णनागर, चिंचवड येथे उघडकीस आली.

राज मिश्रा (रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात झालेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. निलेश बाळकृष्ण सावंत (वय 32, रा. ऋतूस्पर्श सोसायटी, मोशी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलीस उपनिरीक्षक मधुसुदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत हे सुब्रोस लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीस आहेत. पूर्णनगर येथे त्यांच्या कंपनीचे गेस्ट हाऊस असून त्या ठिकाणी कंपनीचे अधिकारी अभिषेख चौहान, तरुण घोष, सी. एस. तिवारी हे तिघेजण राहण्यास आले होते.

रविवारी ते खासगी कामानिमित्त ‘गेस्ट हाऊसच्या’ बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी काम करणा-या आरोपी मिश्रा याने त्यांचे तीन लॅपटॉप, हेडफोन आणि स्टेशनरीचे साहित्य असा 1 लाख 47 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.