Pimpri : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी मोरवाडी, पिंपरी येथे घडली. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

इस्माईल अब्दुलशाकुर शेख (वय 27, रा. मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्माईल यांनी राहत्या घरात छताच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.