Pimpri : महापालिका हद्दीतील कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकाम, पत्राशेड धारकांवर आणि बांधकामात दोषी व कर्तव्यात कसूर करणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नॅशनल ब्लॅक पॅंथरच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा संगीता शहा यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पालिका प्रशासनाच्या वरद हस्ताने, अधिकारी कर्मचा-यांच्या हलगर्जीपणा आणि प्रोत्साहनांमुळे सुरु असणा-या व पूर्ण झालेल्या अनाधिकृत बांधकाम व पत्राशेडवर व अतिक्रमणे यावर कठोर कारवाई करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.