Pimpri: सेवानिवृत्तांच्या दिव्यांग वारसांना सरकारी नोकरीत आरक्षण द्यावे- इदनानी नरेशकुमार

Pimpri: Divyang heirs of retirees should be given reservation in government jobs: Idnani Naresh Kumar लाड समितीने केलेल्या शिफारशीसारखे नियम तयार करावेत व दिव्यांग वारसांना नोकरी देण्यात यावी

एमपीसी न्यूज- सरकारी नोकरी करीत असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या पालकांनी सेवानिवृत्ती अथवा स्वेच्छानिवृत्ती घेतली तर त्यांच्या जागी त्यांच्याच दिव्यांग वारसांना नोकरी देण्यात यावी. यासाठी लाड समितीने केलेल्या शिफारशीसारखे नियम तयार करावेत व दिव्यांग वारसांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इदनानी नरेशकुमार यांनी केली आहे.

इदनानी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्तींना जीवनामध्ये समान रोजगार संधी उपलब्ध होत नाहीत.

या स्तरातील लोकांना राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि स्व-विकासाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असताना तशी वागणूक मिळताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने दिव्यांग लोकांसाठी ठोस धोरण तयार करून सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे.

इदनानी यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत.

* सरकारी नोकरी करीत असलेल्या दिव्यांग व्यक्तीचे पालक सेवानिवृत्त झाल्यास अथवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्यांच्या जागी त्यांच्याच दिव्यांग वारसांना नोकरी देण्यात यावी.

* अपंगत्वताचे प्रमाण शंभर टक्के असलेल्या मुकबधिर व्यक्तींना सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरी देण्याबाबतच्या नियमामध्ये बदल करण्यात यावेत.

* खासगी क्षेत्रात देखील नोकरीसाठी दिव्यांग व्यक्तींना आरक्षण देण्यात यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.