Pimpri : ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुखी संसाराची वाट दाखवली – आदित्य शिंदे

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुखी संसाराची वाट दाखवली. त्यातून तिन्ही लोक आनंदाने भरून जातील हा विश्वास दिला,असे मत ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या गुरुकुल विभागाचे प्रमुख आदित्य शिंदे यांनी मत व्यक्त केले.

निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे चौथे पुष्प आदित्य शिंदे यांनी अवघाची संसार करीन सुखाचा या विषयावर गुंफले. यावेळी टीजीस बँकेचे सचालक रमाकांत आगरवाल , नगरसेवका शर्मिला बाबर, विनोद बन्सल आदी उपस्थित होते.

  • ते पुढे म्हणाले की, सुखी जीवनासाठी मनाचे महत्त्व आहे, तर हे देवा, ‘हे मन कैसे केवढे ऐसे पाहो तरी न सापडे.. हे मन कसे आहे, केवढे आहे, पाहू म्हटले तर हाती सापडत नाही. पण त्याच्या भटकण्याला त्रलोक्यही कमी पडते, ते बुद्धीला छळते, कोणताही निश्चय करू देत नाही.

‘अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।।
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ।।३ ।।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करूनी राहे ।।४।।

 

  • हा माउलीचा अभंग निव्वळ अभंग नसून ती एक प्रतिज्ञा आहे. अवघ्या जगाला सुखी करण्यासाठी केलेली. यामधून माउली दु:ख आणि दु:खीवृत्ती कवटाळून बसलेल्यांना दु:खाला खूप मोठं न समजता राहायला सांगून म्हणतात की, ‘मी अवघा संसार सुखाचा करीन, सर्वत्र आनंद भरीन.’ माझं जे माहेर आहे पंढरपूर जिथे सर्व आनंदाचे भांडार आहे. पांडुरंग नावाचा जो आनंदाचा कंद आहे, त्याला मी भेटेन. मी जे काही पुण्य केलंय ते फलद्रुप करीन आणि माझ्या पांडुरंगाला मिठी मारीन आणि त्यावेळेला त्याला मिठी मारीन त्यावेळी मीही त्याच्याशी साम्यरूप होईन. तो आनंदस्वरूप आहे. मग, मीही आनंदस्वरूपच होऊन जाईन.

व्यवहारी जगामध्ये आमची धावाधाव सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य यासाठी असते. लोकांची धावाधाव आनंदासाठी असते. जर सत्ता, संपत्तीमध्ये आनंद एकवटला असता तर लोकांनी पालख्या सत्ताधीशांच्या किंवा श्रीमंतांच्या उचलल्या असत्या, पण वास्तवता ही आहे की, सत्ता, संपत्ती हे क्षणभंगूर आहे. आजचा सत्ताधीश उद्या सामान्य होणार आहे. आजीचा माजी होणार आहे. आजचा संपत्तीचा मालक उद्या कपल्लकही होऊ शकतो. म्हणजे ते क्षणिक आनंद देतात. जे माजी होणार आहेत. त्यांच्या निघतात त्या मिरवणुका, पण जे शाश्वत आनंद देतात, विचारांची उंची देतात.

  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमती कुलकर्णी यांनी केले. परिचय मृणालिनी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी अनंतपुरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.