Pimpri : यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार

एमपीसी न्यूज – पुण्यातील यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या वतीने राजेश दिवटे लिखित ‘प्रगतीला पंख नवे’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा तर निवृत्तीपूर्ण सत्कार होणार आहे. यानिमित्तविविध राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, युवा समाजरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय गुरु गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय गुणवंत पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे.

चिंचवड येथील रस्टन कॉलनी येथे 29 मे रोजी हे पुरस्कार होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ कृषीतज्ञ रश्मीकुमार अब्रोल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. टी.ए. मोरे असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मिसेस इंडिया शुभांगिणी सांगळे असणार आहे. तर पुरस्कार वितरण सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील खळदकर यांच्या हस्ते होणार आहे.

  • राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारात डॉ. व्ही. पी. पवार, रामनाथ ज-हाड, साहेबराव श्रीमंदिलकर, विलास राकले. राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्कार – प्रमोद मांडेकर, उमाकांत मिटकर, राहुल चौधरी, निळकंठ वडमारे, प्रताप दातार, डॉ. सुनील चौधरी. राज्यस्तरीय गुरुगौरव पुरस्कार – प्रा. व्ही. एस. कणसे, बाबासाहेब दुगाणे, ज्ञानेश्वर बडगे, शरदचंद्र नातू, संतोष पाचपुते, बाजीराव जाधव. राज्यस्तरीय महिला समाजरत्न पुरस्कार – अनुराधा गुंडेवार, डॉ. अपर्णा शिंदे, सीमा राऊत-पाटील, संगीता भापसे, राजश्री जायभाये, राजश्री कोकाटे. राज्यस्तरीय गुणवंत पत्रकार पुरस्कार – बापूसाहेब गोरे,संजय बेंडे, ज्ञानेश्वर गायकवाड, नंदकुमार जाधव. उद्योजकांचा विशेष सन्मान – ज्ञानेश्वर बेलुसे, विठ्ठल शिंदे, सयाजी जाधव, विजय गुजर, मिलींद पांडे, प्रज्ञा जगताप यांना प्रदान करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.