Alandi : ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ संस्कारक्षम उपक्रमासाठी 50 शाळांचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीसी न्यूज : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आयोजित (Alandi) ओळख ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम उपक्रमाचे चर्चासत्र प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवासमध्ये पार पडले. या चर्चा सत्रात प्रथमतः श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी ओळख ज्ञानेश्वरी विषयी प्रास्ताविक माहितीद्वारे मनोगत व्यक्त केले.

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी श्री ज्ञानेश्वर विद्यालयात चाललेल्या या उपक्रमाबद्दल माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या चर्चा सत्रात ओळख ज्ञानेश्वरी मध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते शिक्षण घेत असताना स्वतः मध्ये घडलेले बदल त्यामध्ये अभ्यासात एकाग्रता, सभाधीटपणा, श्रवण व संस्कार याबद्दल त्यांनी माहिती दिली.

प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी ओळख ज्ञानेश्वरी या उपक्रमाचे संपूर्ण पालकत्व संस्थाने स्वीकारले आहे. हा उपक्रम पुढे ही संस्थान मार्फत चालू राहील. तसेच अनेक शिक्षण संस्थेशी या संदर्भात बोलणे चालू असून त्या सहभागी होतील. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विश्वस्त विकास ढगे पाटील यावेळी म्हणाले हा उपक्रम जिल्हास्तरीय, तालुका स्तरीय सर्व शाळा शिक्षण संस्थेत राबविण्यात यावा यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांसमोर मांडण्यात येईल. एस जी मुंगसे, दीपक मुंगसे यांनी या उपक्रमा संदर्भात यावेळी उपस्थितांना माहिती दिली.

ओळख ज्ञानेश्वरी उपक्रम शिकवणारे अध्यापक श्रीधर घुंडरे यांनी या उपक्रमातील अभ्यासक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओळख ज्ञानेश्वरीचे अध्यापक उमेश बागडे यांनी केले. तसेच त्यांनी आजी माजी शिक्षक, वारकरी शिक्षण संस्थेतील मान्यवरांना आवाहन केले, की या उपक्रमात सहभाग घ्यावा.

संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्या ज्ञानदानाची सेवा ही या उपक्रमाला लाभावी. ओळख ज्ञानेश्वरीची या संस्कारक्षम उपक्रम चालू होण्यासाठी सुमारे 50 शाळेने चर्चासत्रा (Alandi) दरम्यान नाव नोंदणी केली आहे. जून महिन्यात या उपक्रमाची सहभागी शाळेमध्ये सुरुवात होईल असे यावेळी त्यांनी सांगितले.

या चर्चा सत्राच्या कार्यक्रमात बहुळ, धानोरी, रासे, मरकळ, राजगुरूनगर, चिंबळी, बालेवाडी, इंदापूर, बारामती इ.ठिकाणच्या शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक उपस्थित होते. तसेच व्यवस्थापक माऊलीं वीर, तुकाराम गुजर, शिवाजी खांडेकर, ॲड.विष्णू तापकीर इ.मान्यवर उपस्थित होते.

Chakan : अपघातात वीजखांब जमीनदोस्त; पर्यायी व्यवस्थेतून चाकणमधील वीजपुरवठा सुरु

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.