Pimpri: ‘राजगृह तोडफोडप्रकरणी निषेध नोंदविताना शासकीय, खासगी मालमत्तांचे नुकसान होऊ देऊ नका’

'Don't allow damage to government and private property while protesting against palace demolition' : पोलिसही लवकरच या आरोपींना अटक करतील

आमदार अण्णा बनसोडे यांचे पिंपरीकरांना आवाहन

एमपीसी न्यूज – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहाची मंगळवारी (दि.7) सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध सध्या राज्यभर सुरू आहे. पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच राजगृह तोडफोडप्रकरणी निषेध नोंदविताना शासकीय, खासगी मालमत्तांचे नुकसान होऊ देऊ नका’ असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

अज्ञात समाजकंटकांकडून राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच घरातील कुंड्यांचेही मोठे नुकसान केले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. सध्या या घटनेचा निषेध राज्यभर सुरू आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही याचा तीव्र निषेध केला आहे.

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध नोंदवित असताना कुठलाही अनुचीत प्रकार घडू देऊ नका, निरर्थक गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन जनतेला केले आहे.

सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. पोलिसही लवकरच या आरोपींना अटक करतील, त्यांच्यावर योग्य कारवाई करतील.

पिंपरीच्या नागरिकांनी शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करु नये. शासकीय तसेच खासगी मालमत्तांचे नुकसान करू नये, असे आवाहनही आमदार बनसोडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.