BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडूनही पूरग्रस्तांना मदत

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या वतीने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीय आरोग्य पथकरवाना करण्यात आले आहे.

कोल्हापूर आणि सांगली या दोन भागासाठी दोन वैद्यकीय पथक तयार केले आहे. यामध्ये सर्व सेवासुविधांनी युक्तरुग्णवाहिका, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, दहा लाखांहून अधिक किमतीची आवश्यक औषधे तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य व उपकरणांचा यात समावेश आहे.

  • यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एसभवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच चव्हाण उपस्थित होते.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ स्मिता जाधव, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही वैद्यकीय आरोग्य पथके कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठविण्यात अली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.