Pimpri : डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जनजागृती

एमपीसीन्यूज: पिंपरी येथील डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या वतीने जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात(Pimpri) आले होते.

या कार्यक्रमासाठी शैक्षणिक संचालिका डॉ. वत्सला स्वामी, अधिष्ठाता डॉ. जे एस भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच एच चव्हाण, बाल रोग विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा माने, हिमॅटॉलॉजिस्ट डॉ. ज्ञानेश्वर उपासे, प्राध्यपक डॉ. विनिता पांडे आदी उपस्थित होते.

दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, जे आई वडीलां पासून मुलांना येतो. या आजाराचे लक्षण जवळपास 3 महिन्या नंतर कळून येतात. थॅलेसीमिया दिन साजरे करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये रक्ताशी निगडित या गंभीर आजाराबद्दल जनजागृती तसेच या आजारांच्या उपचार पद्धतीबाबत जागरूकता निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश आहे.

थॅलेसीमिया आजार कसा होतो,  त्यांची लक्षणे कोणती, त्यावर उपचार काय आहेत, या आजाराचे प्रकार, पथ्ये, आहार, दिनचर्या,  काळजी कशी घ्यावी, अस्थी मज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन) आदी विषयक माहिती देण्यात(Pimpri) आली.

Pune : विमाननगर येथील आयटी हब इमारतीला भीषण आग

थॅलेसीमिया विषयी समाजामध्ये जागरूकता वाढणे गरजेचे आहे.  आपल्या देशात थॅलेसीमियाची स्थिती पाहता वर्षाला 8 ते 10  हजार नवीन रुग्ण तयार होतात ते आटोक्यात कसे आणता येतील व भविष्यात थॅलेसीमिया हा आजार पूर्ण पणे थांबवणे आणि आजाराचे पुढील गंभीर स्वरूप टाळण्यासाठी आताच योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे. यामध्ये आजाराविषयक  तपासण्या व उध्दभवणारे दुष्परिणाम, उपचारपद्धतीचा अवलंबकरून दूर करता येतील त्यासाठी रुग्ण पालक व समाजघटकांना एकत्र करून त्याच्यामध्ये जागृकता निर्माण करणे गरजेचे आहे.

हा आजार मुळापासून घालवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बीटा थॅलेसीमिया या प्रमुख आजार पूर्ण पणे बरा करणारी उपचारपद्धती म्हणजे  बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन जगभरात व भारतात ही केली जाते.  ज्यांना ते शक्य नाही त्यासाठी वारोंवार रक्त चढवून रक्तघटकांची योग्य तपासणी करणे  हा दुसरा पर्याय उपलब्ध आहेत.  गरोदरपणात सुद्धा तपासणी करवून घेणे. रुग्णाचे हिमोग्लोबिनचे स्तर 11 -12 राखण्याचे प्रयत्न करावे. वेळच्या वेळी औषधे घेणे, निदान पूर्ण करणे आणि महत्वाचे म्हणजे  नव्याने विवाहबंधनात अडकण्या आगोदर रक्ताशी निगडीत चाचण्या करून घेतल्या तर या आजारांला पूर्ण पणे आळा बसेल असे मत हिमॅटॉलॉजिस्ट डॉ ज्ञानेश्वर उपासे यांनी सांगितले.

थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय गेली अनेक वर्ष अग्रेसर आहे. विशेषतः  कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्या सहकार्याने थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालयात  विविध सेवा या मोफत दिल्या जातात. रुग्णांच्या डे केअर सेवांपासून ते रक्त देणे, औषधोपचार, तपासणी आदी रुग्णहितार्थ आम्ही कटिबद्ध आहोत.  यापूढे आम्ही अस्थी मज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन) करण्याचा संकल्प आहे. आमच्या रुग्णालयात थॅलेसेमिया क्लीनिक दर गुरुवारी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यत सुरु असते.  समाजात असे गरजू रुग्ण आढळले तर आमच्या रुग्णालयाशी संपर्क करण्याचे आवाहन बाल रोग विभागाच्या प्रमुख डॉ शैलजा माने यांनी (Pimpri)केले.

Hinjawadi : वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात बेदम मारहाण

रुग्ण, पालक तसेच डॉक्टर्स इतर स्टाफ यांना एकत्र करीत यांच्यातील स्नेह वाढवा या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  एकूण 33 थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांनी सहभाग घेतला होता. रुग्णालयातील उपचाराबद्दल रुग्णांनी व त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले  तसेच या रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली . यावेळी त्याचे पालक देखील(Pimpri) उपस्थित होते.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.