Hinjawadi : वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात बेदम मारहाण

एमपीसी न्यूज  – वाहतूक नियमन करत (Hinjawadi )असलेल्या वाहतूक पोलिसाला एका कार चालक महिलेने बेदम मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. 8) सकाळी अकरा ते एक  पद्मभूषण चौक, हिंजवडी येथे घडला. पोलिसांनी कार चालक महिलेला अटक केली आहे.
पोलीस हवालदार रोहिदास धोंडू बोऱ्हाडे असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमृता शाम केसवड (वय 40, रा. खराबवाडी, चाकण) या महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते सोमवारी सकाळी अकरा वाजता हिंजवडी येथील पदमभूषण चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी चौकात नाकाबंदी लावली असताना आरोपी महिला कार (एमएच 12/सीडी 8361) मधून आली. तिने सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास (Hinjawadi )करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.