BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: रक्षाबंधनानिमित्त पीएमपीएमएलच्या आजपासून 120 जादा बसेस

एमपीसी न्यूज – पुणे परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधननिमित्त पिंपरी-चिंचवडसाठी 120 जादा बस सोडल्या जाणार आहेत. 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान या जादा बस धावणार आहेत.

यंदा रक्षाबंधन 15 ऑगस्ट रोजी आहे. स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने प्रवाशांची संख्या जादा असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी तसेच एक दिवसआधी व नंतर असे तीन दिवस 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान जादा बसेसची सेवा दिली जाणार आहे.

  • पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे धावणाऱ्या 1 हजार 673 बसेस बरोबर पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी 120 जादा बसेसचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

त्यासाठी पीएमपीएमएलच्या चालक, वाहक, पर्यवेक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, महत्वाच्या मार्गावर बस संचलन नियंत्रणासाठी अतिरिक्‍त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3