Vadgaon Maval : वडगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने कोयनानगर भागात 100 पूरग्रस्त कुटुंबांना मदत

एमपीसीन्यूज – मदत नव्हे कर्तव्य, या भावनेतून वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कोयनानगर भागातील 100 पूरग्रस्त कुटुंबांना घरगुती साहित्य, किराणा माल, स्वयंपाक शेगडी, भांडी, साडी, पाणी बॉटल आदी वस्तूंची मदत करण्यात आली.

आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस, महिला, युवक, ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय विभाग, विद्यार्थी सेलच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू जमा करण्यात आल्या होत्या.

राजेश बाफना, पंढरीनाथ ढोरे, अतुल राऊत, विशाल वहिले, मंगेश खैरे, सोमनाथ धोंगडे, आफताब सय्यद, प्रवीण ढोरे, सुनील शिंदे, भाऊसाहेब ढोरे, मयूर गुरव, विनायक लवंगारे, सुहास विनोदे, विकास कदम, विकास कडू, सोनू पिंजण, प्रथमेश घाग, राहील तांबोळी, शंकर सुतार, संदीप नवघणे, विजय यमकर आदी पदाधिकाऱ्यांनी मिरगाव, डोकावळे, उंबळी, आंबेघर, बाजे या गावी जाऊन 100 कुटुंबांना मदत सुपूर्द केली.

यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र कुडे, सुरेश जांभुळकर, महिलाध्यक्षा मीनाक्षी ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राहूल ढोरे, गणेश ढोरे, शरद ढोरे, अमर चव्हाण, शैलेश वहिले, किसन

वहिले, अरुण वाघमारे, सचिन ढोरे, अभिजीत सुतार, अतुल ढोरे, आकाश शिंदे, सागर कदम, हर्षल बाफना, संतोष खैरे, बालाजी ग्रुप, स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान, राजमुद्रा मार्ट आदींनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.