Pimpri : शहरात ईद-ऊल-अजहा (बकरी ईद) ‘थोडी-खुशी-थोडी-गम’मध्ये साजरी

पूरग्रस्तांना सढळ हातांनी सर्वोत्तरी मदत करा; नमाज पठणप्रसंगी विविध ठिकाणी धर्मगुरुंचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात ईद-ऊल-अजहा (बकरी ईद) निमित्त ‘थोडी-खुशी-थोडी-गम’मध्ये मुस्लिम बांधवांनी साजरी केली. ईद-उल-अजहा किंवा बकरी ईद हा एक मुस्लिम सण असून हा सण जगभर साजरा केला जातो. इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे.

आज पिंपरी-चिंचवड शहरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मजीद आणि मदरसाकडे वळाली.

  • निगडी, आकुर्डी, राहूलनगर, ओटास्किम, कस्तुरी मार्केट, ट्रान्सपोर्टनगर, दळवीनगर, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहनननर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मजीद व मदरसामध्ये मौल्लानांनी मुस्लिम बांधवांना नमाज पठण केले. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या पंधरा दिवसापासून सततच्या पावसामुळे सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही लाख पूरग्रस्तांना वेगवेगळ्या शाळा, संस्था, गोडाऊन, मदरसे आदी ठिकाणी ठेवण्यात आले आहे. भारतीय जवानांनी अनेकांचे प्राण वाचून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचविले आहे. शासन, समाजलक्षी संघटना देखील सर्वोत्तर मदत करत आहे.

  • अशा वातावरणात ईदच्या निमित्ताने अनेक मुस्लिम बांधवांनी बकर्‍याची कुर्बानीचा खर्च वाचवून हा खर्च पूरग्रस्तांना देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आजच्या ईदच्याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, आकुर्डी, चिंचवड, घरकुल, भोसरी, पिंपरी, वाकड, दापोडी आदी ठिकाणी ईदच्या नमाज पठणाच्यावेळी धर्मगुरुंनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अनेक मुस्लिम बांधवांनी देखील आजची ईद साधेपणाने साजरी केली. काही ठिकाणी पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू जमा करण्याची मदत केंद्रे सुरू करण्यात आले असून तेथे मुस्लिम बांधव तसेच इतरांनीहि आपली शक्यती मदत देण्याचे आवाहन ईदच्या नमाज पठणप्रसंगी करण्यात आले.

निगडी येथील हजरत इस्माईल शाह दर्गाह और नुरानी मस्जिद मध्ये मौलाना मोहम्मंद शाहिद, हाफीज जहूर अहमद यांनी नमाज पडविला. त्याचे आयोजन अध्यक्ष मुजीब शेख, रशिद शेख, मुजिब शेख, समद मुल्ला, सय्यद साब आदींनी केले. रशिद शेख व सामाजिक कार्यकर्ते गुलामअली भालदार यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

  • निगडी ट्रान्सपोर्टनगरमध्ये कोहिनूर मस्जिदमध्ये अध्यक्ष शेख यांनी नियोजन केले. ओटास्किम फातीमा मशीदमध्ये अध्यक्ष हाफीज नुरू, अब्दुल रज्जाक मशीदमध्ये अध्यक्ष साजीद शेख, राहूलनगर येथे नुरूल ईस्लाम मशीदमध्ये अध्यक्ष एजाज आझाद, कस्तूरी मार्केट येथील शमशूल उलूम मशीदमध्ये अध्यक्ष अजमल खान यांनी व्यवस्था केली. आकुर्डी मदीना मशीदमध्ये व अकसा मशीदमध्ये नमाज पठण झाले.

चिंचवडगाव येथील ईदगाह मैदानावर मौलाना मिनाजउद्दीन शेख, इमाउलहक सय्यद यांनी नमाज पढविला. हमीद मुलानी यांनी संयोजन केले. विविध संघटना, राजकीय, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

  • चिंचवड स्टेशन येथील दवा बाझार येथील समा ए दिन ए आदब मजीदमध्ये मौलाना मोहसीन सय्यद यांनी नमाज पठण केले. तसेच मुस्लिम बांधवांना परोपकाराचा संदेश देऊन संकटग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष अब्दुलकदीर मन्यार, जाकीर मेमन, राजमहम्मद अत्तार, फिरोज पठाण, मोहसीन मुल्ला, जहीर सय्यद, निहाल शिकलगार, आशरफ जमादार आदी उपस्थित होते.

चिंचवड स्टेशन येथील जामीया गौसीया मजीदमध्ये मौल्लाना फैज अहमद फैज यांनी नमाज पठण केले. काळभोरनगर येथे फारूकीया या मशीदमध्ये मौलाना लईक महमद शेख यांनी नमाज पठण केले. अध्यक्ष आलाभाई खान, साबीर खान, अस्लम बेग, जावेद खान यांनी व्यवस्था केली. मोहननगर येथे हिदायतूल मुस्लमीन मशीदीत हाजी ईसा खान आदींनी व्यवस्था केली. यावेळी माजी नगरसेवक अस्लम शेख, भाईजान काझी, निहाल पानसरे, झिशान सय्यद, साजिद खान आदींनी संयोजन केले.

  • चिंचवडगाव, पिंपरी लिंकरोड येथील ईदगाह मैदानालगत दफनभूमी येथे ईदच्या नमाज पठणानंतर तसेच शहरातील विविध ठिकाणच्या दफनभूमी परिसरात येथे मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरीच्या ठिकाणी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.