Pimpri : विकसित भारत संकल्प की भाजपची प्रचार यात्रा?

भाजपचे उपरणे परिधान करुन नेते सहभागी

एमपीसी न्यूज – विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाद्वारे (Pimpri) केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शहरातील नागरिकांना देण्यासाठी माहिती देणारे रथ शहरात फिरत आहेत. मात्र, भाजपचे नेते कमळ चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन यात सहभागी होत आहेत. त्यामुळे विकसित भारत संकल्प की भाजपची प्रचार यात्रा? आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ क प्रभागातील नागरिकांना देण्यात आला. त्यामध्ये पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना, मोफत आरोग्य तपासणी, आधारकार्ड दुरुस्ती केंद्र, गट प्रमाणपत्र वाटप, बचत गट नोंदणी अर्ज वाटप, मोफत औषधे वाटप, राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत विविध योजना तसेच पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेंतर्गत लहान व्यावसायिकांसाठी 10 हजार रुपये पर्यंतचे कर्ज अशा विविध योजनांचा समावेश होता. इंद्रायणीनगर येथे 900 पेक्षा जास्त तर बालाजीनगर येथे 500 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. तसेच पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मैदान येथे 300 पेक्षा जास्त तर नेहरूनगर प्राथमिक शाळा येथे 900 हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.

Hadapsar : आठ दिवसांत हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही, तर महापालिका आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू – प्रमोद नाना भानगिरे

या संकल्प यात्रेवेळी पिंपरी येथील कार्यक्रमास आमदार उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, सरचिटणीस नामदेव ढाके भाजपचे कमळ चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन सहभागी झाले होते. त्यासोबतच तुषार हिंगे, केशव घोळवे, राजू दुर्गे, माऊली थोरात, अर्जुन ठाकरे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, अजय पाताडे, शेखर चिंचवडे (Pimpri) तसेच वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

बालाजीनगर येथील कार्यक्रमास स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, समाजविकास विभागाच्या रेश्मा पाटील तसेच वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. इंद्रायणीनगर येथील कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी डी. डी. कांबळे, माजी महापालिका कर्मचारी नंदकुमार ताकवले तसेच प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.

नेहरूनगर प्राथमिक शाळेतील कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे भोसले तसेच प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिक व मान्यवरांनी सामूहिक आत्मनिर्भर शपथ घेतली. क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी शपथेचे वाचन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.