Hadapsar : आठ दिवसांत हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही, तर महापालिका आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू – प्रमोद नाना भानगिरे

एमपीसी न्यूज – आठ दिवसांत हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही, तर महापालिका (Hadapsar) आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू, असा स्पष्ट इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला. हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून हडपसरकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्रवास करतांना तासनतास आपला वेळ ट्रॅफिकमध्ये वाया घालवावा लागत आहे. प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याबाबत कोणताही ठोस असा निर्णय घेत नसल्यामुळे आज महात्मा फुले चौक, मुंढवा येथे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मुंढव्यातील महात्मा फुले चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व रेणुकामाता मंदिर, केशवनगर या रस्त्यावर सद्याच्या घडीला खुप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच येथील वाहतूक व्यवस्थेचे सुरळीत नियोजन करण्यासाठी, महानगरपालिकेने केशवनगर ते मांजरी पर्यंत जिथे उड्डाणपूल आहे तिथे अंडरपास करावा तसेच येथील अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे या मागणी साठी आज महात्मा फुले चौक, मुंढवा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रस्ता रोको केल्यानंतर काही शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी एक रुग्णवाहिका आणून कश्याप्रकारे या वाहतूक कोंडीमध्ये एखाद्या रुग्णाचे प्राण जाऊ शकतात, याचा जिवंत देखावा प्रशासनाला दाखवून दिला. तसेच आंदोलनस्थळी बोलताना, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Hadapsar) म्हणाले की “येथील स्थानिक नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून संपूर्ण हडपसर हे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे,

पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला यासंबंधी निवेदन देवूनही, प्रशासन याविषयी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणतेही नियोजन करत नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसात केशवनगर मांजरीचा अंडरपास करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला नाही, तर आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू” अशा पद्धतीचा इशारा दिला.

Pune : राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज, पण खरंच पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?

येथील आमदार, खासदार, प्रशासन यांना या समस्येविषयी वारंवार, निवेदन, पत्रे, सूचना देवूनही त्यांच्याकडून या प्रश्नावर काहीच मार्ग निघत नाही. दरम्यान या परिसरात असणाऱ्या IT कंपन्या या ट्रॅफिकच्या त्रासाला कंटाळून स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात फटका पोहचू शकतो. आणि म्हणून येणाऱ्या भविष्याची जाण ठेऊन लोकप्रतिनिधी व प्रशासना विरोधी आज शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी हजारो शिवसैनिक व हडपसर भागातील शेकडो स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी होते. व प्रशासनाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली . यावेळी महापालिका उपायुक्त काटकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मागणी केलेल्या प्रश्नावर, तातडीचे बैठक घेण्यासंबंधी निर्देशित केल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हासभाऊ तुपे, शहर प्रवक्ते, अभिजित बोराटे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, उपशहर प्रमुख विकी माने, संतोष राजपूत, मा. नगरसेवक लक्ष्मण आरडे, शहर उपसंघटक दिपक कुडाळ, शहर संघटक खन्नासिंग कल्याणी, युवासेना हडपसर विधानसभा उपाध्यक्ष सुमित बोबडे, विभागप्रमुख प्रकाश लाकडे, विभागप्रमुख स्वप्नील गायकवाड हडपसर-केशवनगर विभागप्रमुख अक्षय तारू, हडपसर महिला आघाडी अध्यक्ष निशीगंधा थोरात, युवतीसेना शहराध्यक्ष सलोनीताई गुंजाळ आणि हजारो शिवसैनिक व हडपसर परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.