Pune : राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज, पण खरंच पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?

एमपीसी न्यूज – उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा पोटनिवडणूक (Pune) तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. त्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. मात्र, काही महिन्यांचाच कालावधी शिल्लक राहिल्याने ही पोटनिवडणूक होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागा वाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आहे. तरीही राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले तर, आपणही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले.  

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप सज्ज आहोत. तशा प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक कधी घ्यायची, हा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. आमच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत उमेदवार निश्चित होणार आहे.

Dighi : घरगुती भांडणातून महिलेला लोखंडी पाईपने मारहाण, पती, सासू, जाऊ या तिघांवर गुन्हा दाखल

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, पुण्याची जागा ही काँग्रेसची आहे. राष्ट्रवादीने (Pune) दावा केला असला तरी त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. उच्च न्यायालयाला निवडणूक घेण्याचे आदेश देण्याचे अधिकार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाला ते अधिकार आहेत. त्यामुळे निवडणूक होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. आपणही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.