Dighi : घरगुती भांडणातून महिलेला लोखंडी पाईपने मारहाण, पती, सासू, जाऊ या तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरगुती भांडणातून महिलेला लोखंडी (Dighi) पाईपने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात पती सासू व जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 30 नोव्हेंबर रोजी दिघी येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि.14) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पती योगेश शिवाजी दिवटे (वय 37, रा. दिघी) व दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPSC : एमपीएससीकडून पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती सासू व जाऊ यांनी घरातील भांडणामध्ये (Dighi) फिर्यादीला शिवीगाळ केली. यावेळी पतीने घरात असलेल्या लोखंडी पाईपने हातावर जोरात मारले. यामध्ये हाताचे हाड मोडून फिर्यादी या गंभीर जखमी झाल्या. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.