Pimpri: शहराच्या 19 माजी महापौरांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत शहराचे प्रथम नागरिक हे महापौरपद भूषविणाऱ्या 19 माजी महापौरांचा आज (बुधवारी) सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

महापालिका मुख्यालयात दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पालिकेच्या स्थापनेपासून 24 जणांनी शहराचे महापौरपद भूषविले आहे. त्यापैकी पाच माजी महापौर दिवंगत झाले आहेत. माजी महापौरांच्या अनुभवाचा शहर विकासात हातभार लागावा, त्यांचे मार्गदर्शन लाभावे, याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत माजी महापौरांशी संवाद साधून, त्यांच्याकडून विविध सूचना व अपेक्षित बदलांविषयी चर्चा केली जाणार आहे. तसेच या सर्वांचा महापालिकेच्या वतीने पुस्तक भेट देऊन सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.