Pimpri : बोगस कागदपत्रे सादर करणा-या सल्लागारावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…

एमपीसी न्यूज – बोगस कागदपत्रे सादर करुन कामे (Pimpri) महापालिकेतील कामे मिळविणा-या गुजरातमधील सल्लागारावर गुन्हा दाखल करावा. त्यांच्याकडून पालिकेने अदा केलेली रक्कम वसूल करावी. अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिला आहे.

भापकर म्हणाले, गुजरातमधील एका सल्लागाराने महापालिकेच्या उद्यान विभाग, स्थापत्य विभागासह विविध विभागात करोडोंचा सल्ला दिला आहे. मात्र, सल्लागार म्हणून पालिकेच्या पॅनेलवर नियुक्ती होण्यासाठी त्यांनी बोगस कागदपत्रे पालिकेला जमा केली. त्याआधारे सुमारे 100 ते 125 कोटी रूपयांची कामे केली आहे

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

बोगस कागदपत्रे देऊन महापालिकेची एक प्रकारे फसवणूक केली आहे. त्यामुळे या सल्लागाराला तत्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर 48 तासात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न केल्यास आयुक्तांचाही यामध्ये सहभाग असल्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे या सल्लागारावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून पालिकेने अदा केलेली रक्कम वसूल करावी.

अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात (Pimpri) येईल, असा इशाराही भापकर यांनी दिला आहे.

संबंधित सल्लागाराच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.