Pimpri News : केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा निषेध – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासने, त्या (Pimpri News) माध्यमातून जनतेला दाखवलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सगळीकडे खासगीकरण सुरु असून केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा जाहीर निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, भाजपने शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादित खर्च अधिक 50 टक्के नफा हमीभाव, उत्पन्न दुप्पट, भ्रष्टाचार मुक्त भारत बनविणार, विदेशातील काळे धन भारतात आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख देणार, महागाईला प्रतिबंध करणार, महिला अत्याचार थांबवणार, युवक युवतींना वर्षाला 2 कोटी रोजगार देणार, अशी अनेक आश्वासने दिली,.

मात्र सत्तेत आल्यावर त्याउलट भूमिका घेतली. भूसंपादन कायदा बदलण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची मागणी नसतानाही तीन काळे कृषी कायदे देशावर लादण्याचा प्रयत्न केला. या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत ऊन,वारा, पावसात वर्षभर आंदोलन केले. त्यात 750 शेतकऱ्यांचे बळी गेले. त्यानंतर माफी मागून ही कृषी कायदे मागे घेतले.

Chinchwad : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये गांधी जयंती साजरी

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यात आले. देशातील भ्रष्टाचाराला प्रतिबंध करू शकला नाहीत. त्याउलट भ्रष्टाचार वाढलेला दिसतो. सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, प्राप्तिकर खाते आदी केंद्रीय यंत्रणेचा वापर करून विरोधकांना नामोहरम करून पक्षात घेतले.

पेट्रोल, डिझेल,गॅसची प्रचंड दरवाढ केली. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे किचन बजेट ढासळले आहे. महिला अत्याचारात वाढ (Pimpri News) झाली असून मणिपूर येथे संपूर्ण देशवासीयांना शरमेने मान खाली घालावा लागत आहे. धार्मिक आणि जातीय विद्वेष प्रचंड वाढला आहे. वर्षाला 2 कोटी रोजगार राहिले बाजूला मात्र नोटबंदी व जीएसटीमुळे अनेक युवक युवतींचे रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले आहेत.

एका बाजूला मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, मुस्लिम हे समाज आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला आपण कंत्राटी पद्धत अवलंबून सर्वच समाज घटकांचे आरक्षण संपुष्टात आणत आहेत. या सर्व धोरणांचा व निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करत असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.