Wakad : काळेवाडीत कंटेनरने महिलेला चिरडले

एमपीसी न्यूज : कंटेनरने एका दुचाकीला पाठीमागून (Wakad) धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. दरम्यान कंटेनरचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी सव्वाचार वाजताच्या सुमारास तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.

मीना राजू हर्दे (वय 45, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विजय राजू हर्दे (वय 24) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक शहरुद्दिन हारून (वय 22, रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय आणि त्यांची (Wakad)आई मीना हे दुचाकीवरून (एमएच 14/जेवाय 4396) जात होते. तापकीर चौक येथे त्यांच्या दुचाकीला आरोपी शहरुद्दिन याने त्याच्या ताब्यातील कंटेनर निष्काळजीपणे चालवून पाठीमागून धडक दिली.

त्यामध्ये मीना या रस्त्यावर पडल्या. त्यानंतर कंटेनरचे चाक मीना यांच्या डोक्यावरून गेले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.