Chinchwad : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल मध्ये गांधी जयंती साजरी

एमपीसी न्यूज – ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल मध्ये देखील 2 ऑक्टोंबर (Chinchwad)रोजी परिपाठाच्या वेळी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. सर्वात प्रथम परिपाठ घेण्यात आला. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन मुख्याध्यापिका विद्युत सहारे यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्व प्राथमिक विभागातील रुद्र कदम व अंशुल गिरे महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत उपस्थित होते.

पूर्व प्राथमिक विभागातील रेवती जठार, माध्यमिक विभागातील वैदेही कुलकर्णी, रिया जाधव यांनी महात्मा गांधींविषयी माहिती दिली. तसेच शिक्षिका कीर्ती महाजन यांनी लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी या विषयी माहिती दिली.

शाळेच्या संगीत शिक्षिका व विद्यार्थिनी यांनी महात्मा गांधींचे प्रचलित (Chinchwad) भजन ‘वैष्णव जन तो तेने कहिये म्हटले. पूनम शेलकर यांनी महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रा या सत्याग्रहा विषयी विद्यार्थ्याना संपूर्ण माहिती दिली.

Maharashtra : सरकारला तीन इंजिन तरीही राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर; नांदेड, छत्रपती संभाजीनगर रुग्णालयातील घटनेमुळे राज ठाकरेंचा संताप

मुख्याध्यापिका विद्युत सहारे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व सुट्टीच्या दिवशी देखील आपण हा दिवस साजरा का करतो व का केला पाहिजे याचे महत्त्व मुलांना सांगितले.

अशा प्रकारे राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर दिवशी पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली ते नववीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना अगवेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.