Balewadi : बालेवाडीत सुरक्षा रक्षकाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – बालेवाडी स्टेडीयम (Balewadi ) येथे सुरक्षा रक्षकाचा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाईल हिसकावला. सुरक्षा रक्षकाने चोरट्यांना विरोध केला असता दुचाकीवरील तिघांनी सुरक्षा रक्षकास चोप दिला. ही घटना सोमवारी (दि. 2) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास स्टेडीयमच्या राजवाडा गेट समोर घडली.

अक्षय कुमार काशिनाथ शिंदे (वय 25, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण धनाजी जाधव (वय 24), विशाल दिलीप जाधव (वय 23, रा. हडपसर, पुणे) आणि अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते सोमवारी मध्यरात्री बालेवाडी स्टेडीयमच्या (Balewadi) राजवाडा गेटवर ड्युटीस होते. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास पल्सर दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

Pimpri News : केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभाराचा निषेध – मारुती भापकर

त्यावेळी फिर्यादी यांनी तिघांना विरोध केला. दुचाकीवरील तिघांनी फिर्यादीस हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोळ्याला इजा केली. फिर्यादीचा मोबाईल हिसकावून फेकून दिला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=pKBjF3ikCxc

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.